हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mercedes Benz : मर्सिडीज बेंझ कार घ्यावी असे प्रत्येकालाच वाटत असते. मर्सिडीज बेंझ हा जगातील सर्वात प्रसिद्ध कारच्या ब्रँडपैकी एक आहे. त्यांच्या लाइनअपमध्ये काही सर्वात आलिशान आणि प्रीमियम गाड्या आहेत. भारतातील मर्सिडीज-बेंझ कारच्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत 49.92 लाख रुपयांपासून सुरू होते. आज आपण देशात विकल्या जाणाऱ्या टॉप 5 मर्सिडीज कारबाबत चर्चा करणार आहोत.
Mercedes Benz CLS ही एक प्रगत कार आहे. आता त्यामध्ये आधीपेक्षा जास्त ऍडव्हान्स फीचर्स मिळतात. या कारचा फक्त एकच प्रकार आहे. तसेच यामध्ये 2.0-लिटर डिझेल इंजिन आहे. या Mercedes Benz CLS ची किंमत 84.7 लाख रुपयांपासून सुरू होते.
Mercedes Benz E Class ही किंग बॅक सीटसाठी उत्तम आहे. हे लक्षात घ्या कि, ही एक उत्तम लक्झरी कार आहे जी परवडणाऱ्या किंमतीत येते. या E Class चे लाँग-व्हीलबेस व्हर्जन बॅकसीटमध्ये बसल्यावर लिमोझिन सारखा अनुभव देते. या कारची किंमत 59.08 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 1.5 कोटी रुपयांपर्यंत जाते.
Mercedes Benz S Class ही पूर्णपणे क्लासिक बिझनेस कार आहे. यामध्ये जबरद्स्त इंटीरियर आणि ऍडव्हान्स फीचर्स देखील मिळतात. S-Class ला 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 आणि 3.0-लिटर ट्विन-टर्बो सिक्स-पॉट हायब्रिड पॉवरट्रेन ट्रिमसह मिळतात. या क्लासिक कारची किंमत 1.36 कोटी रुपयांपासून सुरू होते.
Mercedes Benz GLA Class ही कंपनीच्या सर्वोत्तम हॅचबॅक कारपैकी एक आहे. GLA ला एक नवीन स्टाइल देण्यात आली आहे, जी मर्सिडीज Mercedes A-Class सारखी आहे.जी पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह देखील येते. पेट्रोल इंजिन 1.3 लिटर आणि 2.0 लिटर इंजिनसह येते आणि डिझेल इंजिन 2.0 लिटरसह येते. या कारची किंमत 32.33 लाख रुपयांपासून सुरू होते.
Mercedes Benz C Class ही क्लासिक कारपैकी एक आहे. त्याची किंमत 40.90 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 75 लाखांपर्यंत जाते. यामध्ये प्रोग्रेसिव्ह ट्रिममध्ये C200 आणि C220D आणि C 300D AMG लाईन अपडेट करण्यात आलीआहे. ही कार 5 स्टार सिक्योरिटी रेटिंगसह येते. यामध्ये अनेक लक्झरी आणि ऍडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mercedes-benz.com/en/
हे पण वाचा :
Axis Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! आता FD वर मिळणार जास्त व्याज
Bank FD : 100 वर्षे जुन्या असलेल्या ‘या’ बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा
Post Office च्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा दुप्पट पैसे
‘या’ Multibagger Stock मध्ये फक्त 15 हजार रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदार बनले करोडपती !!!