हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। द्राक्षे हे मूळ आर्मेनियातील पीक आहे, पण भारतातही या पिकाची लोकप्रियता वाढू लागली असून लागवड क्षेत्रही वाढत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची लागवड केली जाते. नाशिक आणि सांगली हे द्राक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे आहेत. राज्याच्या ५० टक्के द्राक्ष उत्पादन नाशिक मध्ये होते. भारतात द्राक्ष उत्पन्न करणाऱ्या राज्यांमध्ये आघाडीचे राज्य म्हणून महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यात ३.०९ टक्के व उस्मानाबाद जिल्ह्यात २.६९ टक्के द्राक्षे उत्पादन होते. द्राक्षांची बाग करताना शेतकऱ्यांना खूप काळजी घ्यावी लागते. योग्य दर आणि बाजारपेठ मिळाली तर शेतकऱ्यांना या पिकातून मोठा आर्थिक फायदा होत असतो. दिवसेंदिवस राज्यातील तसेच देशातील द्राक्ष शेती विकसीत होत आहे. नव- नवीन वाण नवीन प्रकारच्या द्राक्षांचे उत्पादन राज्यात घेतले जात आहे. दत्तात्रय नानासाहेब काळे. हे सोलापूर जिल्ह्यातील असून त्यांनी आपल्या प्लांटमध्ये विविध प्रकारच्या वाण/द्राक्षांचे प्रकार विकसित केले आहेत.
द्राक्षांमधील बियाणे विरहित (सीडलेस) वाण विकसित केल्यामुळे दत्तात्रय काळे यांना २०१९ च्या ग्रासरुट्स इनोव्हेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज त्यांनी कृषी जागरण मराठीच्या ‘फार्मर दी ब्रँड’ (Farmer The Brand) सदराच्या फेसबुक लाईव्हमध्ये बिया नसलेल्या द्राक्षांविषयी( इलॉगगेटेड पर्पल सीडलेस ग्रेप्स) ( elongated purple seedless grapes ) याविषयी माहिती दिली. हे वाण कशाप्रकारे विकसीत झाले हे सांगत असताना आपल्या पहिल्या सीडलेस वाणापासून हे किती वेगळे आहे, हेदेखील त्यांनी सांगितले. दत्तात्रय काळे यांनी द्राक्ष शेती त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर सुरू केली. त्यांचे वडील नानासाहेब काळे यांनी सोनक्का सीडलेस वाण प्रकार १९८० मध्ये विकसीत केला होता. तर १९९० मध्ये शरद सीडलेस हा प्रकार विकसीत केला होता. आता दत्तात्रय काळे यांनी आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून त्यांनी सरिता आणि नानासाहेब पर्पल सीडलेस,सोनक्का सीडलेस आणि नवे सोनव्का धणका हे काळ्या रंगाच्या द्राक्षांचे प्रकार विकसित केले आहेत.
काळे यांच्या मते, हा प्रकार सर्वोकृष्ट राहिला आहे. झाडापासून ते फळापर्यंत सर्व घटकांमध्ये दोन्ही वाणांमध्ये फरक आपल्याला सहजपणे दिसून येतात. इलॉगगेटेड पर्पलची पाने ही मोठी असतात आणि मऊ असतात. त्यात सोयटोकॉनिकचे प्रमाण जास्त असल्याने घड फर्मोशेन घेण्यास मदत होत असते. या द्राक्षांचा जीए जास्त असतो. या झाडांची दांडी जाड असते. विशेष म्हणजे घड आणि देठातील अंतर जास्त असते. सर्वात महत्त्वाचे आणि वेगळे वैशिष्ट्ये म्हणजे या प्रकारच्या द्राक्षांचे मणी हे सर्वात मोठे आहेत. मण्यांची लांबी ही ५० ते ५५ मीमी असते तर जाडी ही २२ ते २४ मीमी असते. बाकी इतर प्रकारच्या द्राक्षांची मणी यापेक्षा लहान आहेत. मण्यांना जखमाहून बुरशी लागण्याचा धोका या वाणाला फार कमी आहे.
दत्तात्रय यांनी शरद सीडलेस प्रकारासोबत इलॉगेटे्ड बेरीस् बरोबर संकरित केले. त्यातून तयार झालेले द्राक्षे खूप आकर्षक आहेत. २००३ वर्षापर्यंत या प्रकारचे निरीक्षण आणि अभ्यास केल्यानंतर दत्तात्रय यांनी त्यांच्या आईचे नाव या वाणाला दिले. काळे यांनी विकसीत केलेल्या वाणाच्या द्राक्षांना विदेशातही मोठी मागणी आहे. इलॉगेटेड पर्पल सीडलेस ग्रेप्सची टिकवून राहण्याची क्षमता अधिक असल्याने या वाणाची निर्यात अधिक होते. नवीन वाणाविषयी बोलताना काळे म्हणतात की, ‘आमच्या आधीच्या नानासाहेब पर्पल सीडलेस आणि सरिता सीडलेस या वाणातून ही नवीन वाण विकसीत झाली आहे. यामुळे नानासाहेब पर्पलमध्ये असलेला कमीपणा या वाणातून भरुन निघून आला आहे”. यात कोणत्याच प्रकारचा प्रादुर्भाव आढळत नाही जो की, नानासाहेब पर्पल द्राक्षांमध्ये आढळतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’