Wednesday, June 7, 2023

AC मध्ये प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का! लवकरच रेल्वे आकारणार ‘हे’ विशेष शुल्क

हॅलो महाराष्ट्र । आता ट्रेनमधून प्रवास करणे आपल्यासाठी महाग होणार आहे. वास्तविक, रेल्वे अनेक मोठ्या स्थानकांवर यूजर फी (User Fees) वसूल करण्याची तयारी करीत आहे. ट्रेनच्या तिकिटांचा हा एक भाग असेल. TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार AC कोचने प्रवास करणार्‍यांना जास्त फी आकारली जाणार आहे. AC 1 मध्ये प्रवास करणाऱ्यांना युजर फी म्हणून 30 रुपये द्यावे लागतील. तर AC 2 आणि AC 2 मध्ये प्रवास करणार्‍यांसाठी, यूजर फी कमी असेल तर स्लीपर क्लाससाठी माफक असेल.

प्रवाशांकडून मिनिमम यूजर फी घ्यायची की नाही?
TOI च्या अहवालानुसार, मिनिमम यूजर फी 10 रुपये असेल. रेल्वे मंत्रालय यासंदर्भातील प्रस्तावावर काम करीत आहे, जो लवकरच मंजुरीसाठी मंत्रिमंडळात ठेवला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरक्षित नसलेल्या प्रवर्गातून आणि उपनगरी रेल्वे प्रवाशांकडून TOI घ्यायची की नाही यावर चर्चा होणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रत्येक प्रवाशाला यूजर फी द्यावी लागेल. तसेच, जर तुम्ही रेल्वे स्थानकात एखाद्यास सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी गेला असाल तर तुम्हाला प्लॅटफॉर्मच्या तिकिटाव्यतिरिक्त विजिटर फी देखील भरावी लागेल.

युजर फीमुळे बर्‍याच कंपन्यांना होईल फायदा
रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी नुकतेच सांगितले की, यूजर फीमुळे सामान्य प्रवाश्यांना त्रास होणार नाही. पुढील महिन्यात यूजर फी बाबत अधिसूचना जारी केली जाऊ शकते. नवी दिल्ली रेल्वे स्थानक आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या पुनर्विकासासाठी खासगी कंपन्यांकडून निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख रेल्वेने 6 नोव्हेंबरपर्यंत निश्चित केली आहे. यूजर फी ही बर्‍याच कंपन्यांच्या महसुलाची हमी देण्याचा एक मार्ग असेल.

50 स्थानकांच्या पुनर्विकासासाठी यूजर फी आकारण्याची योजना
रोखीच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या रेल्वेने पीपीपी मोडवरील 50 स्थानकांच्या पुनर्विकासासाठी प्रवाशांवर यूजर फी आकारण्याची योजना आखली आहे. या प्रस्तावानुसार, प्रवाशांकडून ट्रेनमधून उतरताना प्रवाश्यांकडून फीच्या 50 टक्के इतकी रक्कम गोळा केली जाईल. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मची तिकिटे खरेदी करणाऱ्यांसाठी दहा रुपये फीही आकारली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.