हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात मोबाईल द्वारे ऑनलाईन पद्धतीने सट्टेबाजी करणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. परंतु अशा प्रकारे सट्टेबाजी मध्ये फसवणूक आणि धोका होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे असं सरकार कडून सातत्याने सांगण्यात येते. मात्र तरीही लोकांच्या डोक्यात काही केल्या प्रकाश पडत नाही, आणि जास्त पैसे कमवण्याच्य नादात लोक अशा गोष्टींना बळी पडतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे असून एका व्यक्तीने ऑनलाईन मोबाईल बेटिंग अँपच्या माध्यमातून अवघ्या ९ दिवसात १२०० लोकांना आर्थिक गंडा लावत १४०० कोटींचा महाघोटाळा केला आहे.
एका चिनी नागरिकाने, भारतातील काही इतर लोकांच्या सहकार्याने, एक फसवे फुटबॉल सट्टेबाजी ऍप्लिकेशन तयार केलं . याच अँपच्या माध्यमातून 9 दिवसांतच 1,400 कोटी रुपयांना लोकांना लुटले. जवळपास 1,200 जणांना आर्थिक फटका बसला. या प्रकरणातील मुख्य संशयित 2020 ते 2022 या कालावधीत भारतात आला होता, त्या दरम्यान त्याने स्थानिकांना पैशाचे आमिष दाखवले. त्याने लोकांना लक्षणीय नफ्याची हमी देताना मे २०२२ मध्ये लॉन्च केलेल्या त्याच्या अॅपवर बेटिंग करण्यास सांगितले. त्याने खास करून 15 ते 75 वर्षे वयोगटातील व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले आणि त्यांच्याकडून दररोज 200 कोटी रुपये कमावले.
९ दिवस ते फुटबॉल सट्टेबाजी अॅप व्यवस्थित चाललं आणि लोकांचाही त्यावर विश्वास बसला. परंतु नऊ दिवसांनंतर ते अँप अचानक काम करणे बंद केले, ज्यामुळे लोकांना त्यांच्या पैशांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर गुजरात पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक तयार केले आहे. तपासांतर्गत या संपूर्ण प्रकरणाचा मार्ग चीनच्या शेन्झेन प्रदेशातील वू उयानबे या व्यक्तीकडे कडे निर्देशित केला. याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील प्रमुख आरोपींना पकडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.