व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शहीद भगत सिंह बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

शहिद भगतसिंह आजही तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत. लाखो युवक भगतसिंहांना आपले आदर्श मानतात. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान मोठे आहे. अवघ्या तेविसाव्या वर्षी देशासाठी शहिद झालेल्या भगतसिंहांची आज जयंती. त्यानिमित्ताने तुम्हाला माहिती नसलेल्या भगतसिंहांबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घ्या…

लहानपणीच हवी होती बंदूक

भगतसिंगांना लहान असतानाच देशभक्तीची ओढ होती. घरी क्रांतिकारी वातावरण असल्यामुळे भगतसिंहानाही क्रांतीची ओढ होती. भगतसिंहांविषयी एक गोष्ट अशी बोलली जाते की, ते लहान असतानाच त्यांना बंदूक हवी होती जेणेकरून त्यांना ब्रिटिशांशी लढता येईल.

जलियनवाला बाग हत्याकांडानंतर

ज्या वेळी जलीयनवाला बाग हत्याकांड झाले त्यावेळी भगतसिंह केवळ १२ वर्षांचे होते. शाळेतून पळून जाऊन भगतसिंह जलियनवाला बाग येथे गेले होते. तिथे त्यांनी भारतीयांच्या रक्ताने ओली झालेली माती एका बाटलीमध्ये भरून घेतली. असे म्हटले जाते की ते त्या रक्ताने माखलेल्या मातीची रोज पूजा करत असत. यावरून आपण भगतसिंह यांची देशाप्रती व देशबांधावाप्रती असलेली तळमळ लक्षात येते.

इतर महत्वाचे –

नेताजी सुभाष चंद्र बोस – The Forgotten Hero

क्रांतिसिंह नाना पाटील जयंती विशेष

एक उकृष्ट अभिनेता

भगतसिंह एक उकृष्ट अभिनेता होते. महाविद्यालयात असताना भगतसिंहांनी एक अभिनेता म्हणून अनेक नाटकांमध्ये काम केले. त्यापैकी एक-दोन नाटकात त्यांनी ‘सम्राट चंद्रगुप्त’ आणि ‘राणा प्रताप’ यांच्या भूमिका केल्या होत्या.

सेंट्रल असेंम्बलीवर बॉम्ब

बहिऱ्यांना आवाज जाण्याकरिता धमाका आवश्यक आहे असे भगतसिंहांचे मत होते. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा आवाज ब्रिटन पर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने भगतसिंह व त्यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या मध्यवर्ती सभेत बॉम्ब फेकला. बॉम्ब हा कमी दर्जाच्या स्फोटक द्रव्यांनी बनवला गेला होता कारण त्यांना कोणालाही जखमी करायचं नव्हतं.

घोषवाक्य

भारतात अनेकांना हे माहिती नाही कि ‘इन्कलाब जिंदाबाद’ नारा हा भगतसिंहांची देन आहे. आधुनिक राजकीय पक्षांनी याचा गैरवापर केला, परंतु हा एक शक्तिशाली नारा होता जो भगतसिंह यांनी ब्रिटीशांविरूद्ध सशस्त्र लढ्याद्वारे तयार केला होता.

इतर महत्वाचे –

नेताजींच्या आझादहिंद फौजेची कहाणी

आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला…

समाजवाद

कुमारवयातच भगतसिंह समाजवादाच्या विचाराने प्रेरित झाले होते. लेनिनच्या नेतृत्वाखाली असलेल्या रशियन बोल्शेव्हीक समाजवादी क्रांतीमुळे त्यांचा उत्साह वाढला होता.

गुलाम असलेल्या भारतात लग्न करणार नाही

जेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं लग्न लावुन देण्याचा प्रयत्न केला तेव्हा म्हणाले की जर या गुलाम असलेल्या भारतात लग्न करणार नाही. आणि ते घर सोडून कानपुर कडे रवाना झाले. तिथे ते हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये सामील झाले. त्यानंतर भगतसिंह यांच्याच आग्रहाने संघटनेच्या नावात ‘सोशलिस्ट’ हा शब्द समाविष्ट करण्यात आला.

ते एक नास्तिक होते

भगतसिंग हे एक चांगले वाचक होते. एक महान विचारवंत होते. त्यांनी मार्क्स, एंगल्स, लेनिन आणि ट्रॉट्स्की यांच्या विचाराचे वाचन केले होते व प्रेरणा घेतली होती. या विचारांनी प्रेरित झाल्यानंतर भगतसिंह विचारपूर्वक एक नास्तिक बनले आणि त्यांनी आपल्या धार्मिक श्रद्धेचा त्याग केला. “मी नास्तिक का आहे?” हा त्यांचा दीर्घलेख सर्वत्र प्रसिद्ध आहे.

क्रांतिकारी लेखक

क्रांतिकारक म्हणून भगतसिंह ब्रिटिशांसाठी एक भयानक स्वप्न बनले होते. भगतसिंह हे एक महान लेखक होते. त्यांनी अनेक वृत्तपत्रांसाठी लिखाण केले होते.

सत्य कथन करणारी डायरी

भगतसिंह हे उत्तम लेखक असल्यामुळे त्यांना दैनंदिनी लिहायची सवय होती. भगतसिंह लाहोरच्या तुरुंगात कैदेत असताना त्यांच्याकडे एक डायरी होती. स्वातंत्र्य आणि क्रांतीबद्दलचे त्यांचे मनोवेधक विचार असलेली ही डायरी वाचण्यासाठी सर्वांना उपलब्ध आहे.

इतर महत्वाचे –

Birsa Munda | बिरसा मुंडा

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचणारे कणखर नेतृत्व : लोकमान्य टिळक

अंतिम निरोप

२४ मार्च १९३१ हा त्यांचा फाशीचा दिवस ठरविण्यात आला होता परंतु लोक जमतील ह्या भीतीने २३ मार्च रोजी त्यांना सायंकाळी ७:३० वाजता फाशी देण्यात आली. सतलज नदीच्या काठावर गुप्तपणे तुरुंगातील अधिकाऱ्यांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले. परंतु, हे लपून राहिले नाही. ही बातमी ऐकून हजारो लोक एकत्र झाले आणि त्यांनी नदीकाठावरची शहीदांची राख गोळा करून मिरवणूक काढली.

फासावर जातानाही चेहर्यावर स्मित हास्य

फासावर जात असताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते, आणि शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीविरोधात घोषणा दिल्या. अनेकांच्या मनामध्ये आजही भगतसिंहांचा वारसा कायम आहे.