राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात एकीकडे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असतानाच राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना मुंबईतील रिलायन्स एचऐन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

भगतसिंग कोशारी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांसोबत आज राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता होती. मात्र त्यापूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं राज्यातील सत्तानाट्याला वेगळं वळणं लागण्याची शक्यता आहे.

कोरोनाची लागण झाल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे पुढील काही दिवस कोणालाही भेटू शकणार नाही हे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच आता सत्तास्थापनाचे दावे प्रतिदावे हे राजभवनापर्यंत पोहचण्यास आणि त्यासंदर्भातील निर्यणांना उशीर होण्याची शक्यता आहे.

 

 

Leave a Comment