मधमाश्यांपासून वाचण्यासाठी तरुणाने कालव्यात मारली उडी अन्…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात एक दुर्दैवी घडली आहे. यामध्ये एका 25 वर्षीय तरुणावर मधमाशांनी हल्ला केला. तेव्हा या तरुणाने मधमाशांच्या हल्ल्यापासून जीव वाचावा यासाठी कालव्यात उडी मारली. मात्र त्याला कालव्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंब, नातेवाईक आणि मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
मृत 25 वर्षीय तरुणाचे नाव महेश रेवतकर असे आहे. महेश रेवतकर हा घटनेच्या दिवशी घरुन त्याच्या चारचाकी वाहनाने शेतावर जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान अचानक त्याच्यावर मधमाशांनी हल्ला चढवल्याने तो सैरावैरा झाला आणि स्वतः चा बचाव करण्यासाठी त्याने वाहात असलेल्या गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात उडी घेतली. यावेळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्याला कालव्याच्या बाहेर निघता आले नाही. त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. संबंधित घटना ही भंडारा जिल्ह्यातील पवनी या शहरात घडली आहे.

या घटनेची माहिती सर्वत्र पसरताच लोकांची घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने कालव्यातून महेश रेवतकर याचा मृतदेह बाहेर काढला. यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पवनी येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. पवनी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे पवनी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.