हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशात आणि राज्यात देखील कोरोनाचे संकट अद्याप टळले नाही. परंतु आता महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी समोर येत असून राज्यातील भंडारा हा जिल्हा कोरोनामुक्त झाला असून जिल्ह्यातील शेवटच्या रुग्णालाही आता डिस्चार्ज भेटला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दुसऱ्या लाटेनंतर कोरोनामुक्त होणारा भंडारा हा राज्यातील पहिला जिल्हा असावा.
भंडाऱ्याचे जिल्हाचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी-डॉक्टरांचे प्रयत्न, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या नीतीमुळे भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. भंडाऱ्यात गेल्या वर्षी 27 एप्रिल रोजी गरदा बुद्रुकमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता, अशी माहिती त्यांनी दिली. शुक्रवारी जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच शुक्रवारी 578 जणांचे सँपल तपासण्यात आले. त्यापैकी एकालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचं आढळून आलं आहे
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ३९ हजार ८३२ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ८०९ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले होते. त्यापैकी ५८ हजार ६७६ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर ११३३ व्यक्ती कोरिनाचे बळी ठरले. जिल्हा करोनामुक्त झाला असला तरी संभाव्या तिसऱ्या लाटेची प्रशासन जय्यत तयारी करीत आ