धक्कादायक ! जावयाने धक्का दिल्याने सासऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू

Bhandara Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जावयाने सासऱ्याला धक्का दिल्याने त्यांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. यावेळी आपल्या मोठ्या भावाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी लहान भावाने कालव्यात धाव घेतली असता त्यांचासुद्धा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आरोपी जावयाने नेमकी कोणत्या कारणामुळे आपल्या सासऱ्याची हत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत. पनवी तालुक्यातील सिंधी या ठिकाणी हि दुर्दैवी घटना घडली आहे. दोन्ही भावांच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. हरी गोविंदा नागपुरे आणि चंद्रभान गोविंदा नागपुरे अशी या दोन्ही भावांची नावे आहेत. यामध्ये हरी नागपुरे 65 तर चंद्रभान गोविंदा नागपुरे 55 वर्षांचे होते. मृत हरी यांना त्यांच्या जावयाने गोसेसच्या उजव्या कालव्याजवळ धक्का दिल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

यावेळी मोठ्या भावाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या लहान भावाचासुद्धा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नागपूरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दोघां भावांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी आरोपी जावयाला अटक करण्यात आली आहे. अनिल नारायण हटवार असे 40 वर्षीय आरोपी जावयाचे नाव आहे.