नवाब मलिकांची प्रकृती गंभीर, स्ट्रेचरवरून रुग्णालयात केले दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांची प्रकृत्ती अत्यंत गंभीर असल्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या मंत्री नवाब मलिक यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, मलिक यांना वैद्यकीय कारणासाठी जामीन देण्यास ईडीने विरोध केला आहे.

मलिक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना आज तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने फेब्रुवारीमध्ये मलिक यांना अटक केली आहे. दरम्यान आज त्यांची प्रकृती गंभीर बनल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या वकिलाने विशेष न्यायालयाला माहिती दिली. यावेळी त्यांनी मलिक गेल्या 3 दिवसांपासून आजारी आहेत आणि आता त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांना व्हीलचेअर/स्ट्रेचरवरून नेण्यात आले आहे, असे सांगितले.