Bharat Jodo Nyay Yatra : आजपासून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात; 14 राज्यात पहायला मिळणार राहूल गांधींचा झंझावात

Bharat Jodo Nyay Yatra Rahul Gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bharat Jodo Nyay Yatra । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. भारत जोडो यात्रेनंतर भारत जोडो न्याय यात्रा हा दुसरा टप्पा असेल. ही यात्रा देशाच्या पूर्व भागातून पश्चिम भागाकडे येणार आहे. यावेळी राहुल गांधी तब्बल देशातील १४ राज्यामधून तब्बल ६७१३ किलोमीटर पायी प्रवास करणार आहेत आणि जनतेत मिसळून त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे मरगळलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा बळ मिळण्याची शक्यता आहे.

कसा आहे भारत जोडो न्याय यात्रेचा रूट – Bharat Jodo Nyay Yatra

मणिपूरची राजधानी इंफाळ येथून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरु होणार आहे. यानंतर हि यात्रा आसाममध्ये येईल, आसाम मध्ये तब्बल आठ दिवस राहुल गांधींचा मुक्काम असून एकूण १७ जिल्ह्यातून ही यात्रा निघणार आहे. यावेळी राहुल गांधी तब्बल 833 किलोमीटरचा प्रवास एकट्या आसाम मध्ये करतील. आसाम यामधील अमगुरी आणि जोरहाट जिल्ह्यात राहुल गांधींची सभाही पार पडेल. आसाम नंतर नागालँड मध्ये भारत जोडो न्याय यात्रा जाईल. त्यानंतर मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि सर्वात शेवटी महाराष्ट्रात हि यात्रा येईल. आणि मुंबईत या भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) शेवट होईल.

एकूण 14 राज्यामधून जाणारी भारत जोडो न्याय यात्रा 110 जिल्हे, 100 लोकसभेच्या जागा आणि 337 विधानसभेच्या जागा असलेल्या भागातून जाणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला याचा कितपत फायदा होतो ते बघावं लागेल. ही यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) एक वैचारिक लढा आहे, जी काँग्रेसने ध्रुवीकरणाचे राजकारण आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अन्यायाविरुद्ध सुरू केली आहे. हा निवडणूक प्रवास नसून राजकीय पक्षाचा वैचारिक प्रवास आहे असे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होते.