Bharat Nyay Yatra । भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत न्याय यात्रा काढणार आहेत. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल राव यांनी अधिकृत घोषणा केली आहे. ही यात्रा सुद्धा आधी सारखीच पाय यात्रा असणार आहे. भारत न्याय यात्रा २० जानेवारी ते 20 मार्च पर्यंत सुरु असणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी आपल्या कार्यकर्त्यांसाठी मणिपूर ते मुंबई असा पायी प्रवास करणार आहेत.
यापूर्वी काढण्यात आलेली भारत जोडो यात्रा हि देशाच्या दक्षिण भागातून उत्तरेकडे गेली होती. देशातल्या जनतेचा भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद सुद्धा मिळाला होता. आता त्याच त्याच धर्तीवर भारताच्या पूर्व भागातून पश्चिम भागाकडे भारत न्याय यात्रा (Bharat Nyay Yatra) धडकणार आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या काही महिन्यापूर्वी मणिपूर येथे हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या त्याचा मणिपूर मधून या भारत न्याय यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मणिपूर येथील जनतेचा राहुल गांधींना किती प्रतिसाद मिळतो हे सुद्धा पाहायला हवं.
6200 किलोमीटर प्रवास- Bharat Nyay Yatra
भारत न्याय यात्रा ही एकूण 6200 किलोमीटरची असेल. ही यात्रा 14 राज्ये आणि 85 जिल्ह्यांतून जाणार आहे. यामध्ये मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी पुन्हा एकदा देशातील आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय हुकूमशाहीचा मुद्दा उपस्थित करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये उत्साह येणार?
भारत न्याय यात्रेच्या (Bharat Nyay Yatra) माध्यमातून राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जोश भरण्याचा प्रयत्न करतील. नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीत तेलंगणा उगाळत अन्य राज्यात काँग्रेसला सपाटून मार खावा लागलाय. त्यामुळे चिंतेत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्याची आवशक्यता आहे. ती या यात्रेच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला बळ मिळू शकते.