मुंबई प्रतिनिधी |रावसाहेब दानवे यांनी आपला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. रावसाहेब दानवे यांच्या जागी नेमकी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे हे पद दिले जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे फेरबदल केले गेले आहेत असे देखील बोलले जाते आहे.
Bharatiya Janata Party (BJP) Maharashtra President, Raosaheb Patil Danve resigns from his post. (file pic) pic.twitter.com/O02r27mZrF
— ANI (@ANI) July 16, 2019
रावसाहेब दानवे यांच्या बद्दल राज्यभर असंतोषाची लाट असल्याने त्यांची या पदावरून उचल बांगडी केली आहे. त्यांना सन्मान पूर्वक या पदावरून दूर करण्यात आले आहे. त्यांना केंद्रात मंत्री बनवून राज्याच्या राजकारणातून त्यांना दूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत स्वतःहून मोठ्या खुबीने त्यांनी आपले नाव सामील करून घेतले होते. तसेच यासाठी त्यांनी फिल्डींग लावण्याचा देखील मोठा प्रयत्न केला होता. मात्र देवेंद्र फडणवीसांच्या मुसद्दी राजकारणापुढे रावसाहेब दानवे यांनी नांगी टाकली. आता ते केंद्रात मंत्री म्हणून काम करत आहेत.
चंद्रकांत पाटील यांचे प्रभावी नेतृत्व आणि त्यांना संघटनेच्या कामाचा असणारा अनुभव पाहता त्यांना या पदावर नेमले जाण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लाडके असल्याने देखील चंद्रकांत पाटील यांना हे पद बोनसमध्ये मिळाले आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील हे मंत्रिपदावर कायम राहणार आहेत.