औरंगाबाद – भरधाव पेट्रोल टॅंकरने एका कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना काल रात्री 11 वाजेच्या सुमारास चिकलठाणा विमानतळ समोरील रस्त्यावर घडली. यामध्ये कार चालकासह दोघे जखमी झाले असून घटनेनंतर टँकर चालक मात्र फरार झाला आहे.
चिकलठाणाकडून सुरेंद्र सिंग हे कारमधून (एम एच 20 ईजे 6586) शहरात येत होते. त्यांच्यासोबत एक नातेवाईक होते. विमानतळा समोरून जात असताना एका टँकरने (एम एच 20 सीटी 6250) त्यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कार रस्त्याच्या बाजूला गेली तर टॅंकर थेट दुभाजकावर चढला.
सुदैवाने सुरेंद्र सिंग व नातेवाईक बचावले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.