राज्यपाल कोश्यारी म्हणजे घरगडी; भास्कर जाधवांची बोचरी टीका

bhaskar jadhav koshyari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे घरगडी आहेत अशी बोचरी टीका शिवसेनेचे आक्रमक नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत भास्कर जाधव बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यपालांसह भाजपवर तोफ डागली.

भगतसिंह कोषारी यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानाचा भास्कर जाधव यांनी समाचार घेतला. यावेळी भास्कर जाधवांनी राज्यपालांवर टीका करताना त्यांचा उल्लेख घरगडी असा केला. तसेच भगतसिंग कोशारी यांच्या महाराष्ट्राच्या विरोधातील वक्तव्याकवरुन लोकांचे लक्ष वळवण्यासाठी संजय राऊत यांना अटक केल्याचीही टीका भास्कर जाधव यांनी यावेळी केली. देशात भाजपची दडपशाही सुरू आहे असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरूनही शिंदे- फडणवीस सरकारला टोला लगावला आहे . राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊच नये. त्याची गरजच नाही. आता लोकांना लोकशाही काय आहे, ते समजले. बिनखात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस सर्व कार्यक्रम भाजपचेच राबवतायत. म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार न होता भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम राबवला जावा अशा माझ्या शुभेच्छा आहेत, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला