भीमा कोरेगावचा इतिहास शाळांमध्ये शिकवला गेला पाहिजे; रामदास आठवलेंची मागणी

Ramdas Athawale
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । भीमा-कोरेगाव येथील लढाईचा इतिहासाचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश झाला पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाई नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. भीमा-कोरेगावचा (Bhim Koregaon) इतिहास शाळांमध्ये शिकवला गेला पाहिजे. त्यासाठी मी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहीन व त्यांच्याशी चर्चाही करेन, असे रामदास आठवले यांनी सांगितले. (Ramdas Athawale pay tribute to Bhima Koregaon war memorial)

रामदास आठवले यांनी शुक्रवारी भीमा-कोरेगाव  येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशात दलित समाजावर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत. त्यासाठी देशात समता प्रस्थापित झाली पाहिजे. तसेच देशातील दलित-सवर्ण हा वाद मिटला पाहिजे. गावागावात एकी झाली पाहिजे. सवर्ण आणि दलितांमध्ये एकी झाली की, देशाचा विकास झपाट्याने होईल. 2021 मध्ये दलितांना न्याय देण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला.

प्रकाश आंबेडकरांना आठवलेंचे प्रत्युत्तर
प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी कोणतीही ठोस योजना नसल्याचे म्हटले होते. या टीकेला रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिले. राज्याकडे कोणताही प्लॅन नाही, हे मला माहिती आहे. पण केंद्र सरकारकडे अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी ठोस योजना आहे. आगामी बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर मदत केली जाईल, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’