धक्कादायक!!!! फेसबूक लाईव्ह नंतर ‘या’ अभिनेत्रीची आत्महत्या ….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | या वर्षामध्ये कलाविश्वात अनेक धक्कादायक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणानंतर कलाविश्वातील अन्य काही सेलिब्रिटींच्या आत्महत्येचीही प्रकरणं समोर येत आहेत. यामध्येच भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिनेदेखील आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अनुपमा पाठक हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

अनुपमाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या एका पत्रात आत्महत्या करण्यामागील दोन कारणं सांगितली आहेत. तसंच आत्महत्येपूर्वी तिने एक फेसबुक लाइव्ह करत चाहत्यांशी संवाददेखील साधला होता. यावेळी तिने तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

अनुपमानं गळफास घेण्यापूर्वी सुसाईड नोट लिहली होती. यात तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याची कारण लिहली आहे. मित्रानं दिलेल्या सल्ल्यानुसार मी एका कंपनीत १० हजारांची गुंतवणुक केली होते. कंपनी माझे पैसे व्याजासकट मागील वर्षी डिसेंबरमध्ये देणार होती. मात्र, आता ती कंपनी माझे पैसे परत देण्यास टाळाटाळ करत आहेत. असं तिनं सुसाइड नोटमध्ये लिहलं आहे. तर, एका व्यक्तीनं लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर माझी दुचाकी गाडी घेतली होती. तेव्हा मी माझ्या मुळ गावी होती. जेव्हा मी परत आले तेव्हा त्यानं माझी दुचाकी देण्यास नकार दिला, असं दुसरं कारण तिनं सुसाइट नोटमध्ये लिहलं आहे.

अनुपमाच्या घरात मिळालेल्या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिस या घटनेचा सखोल तपास करत असून, यातील दोषींवर ठोस पुरावे मिळाल्यानंतर कारवाई केली जाईल, असं काशीमिरी पोलिस स्थानकाचे पोलीस अधिकारी संजय हजारे यांनी सांगितलं.