धक्कादायक ! लग्नाच्या नावाखाली तरुणीवर बलात्कार, रात्रभर म्हणत राहिला…

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमध्ये बलात्काराची आणखी एक घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने मॅट्रोमोनिअल साइटवर ओळख झाल्यावर त्याचे वय ३५ असल्याचे सांगितले आणि निकाहच्या नावावर तरूणीसोबत बलात्कार केला. या तरुणीने ९ महिन्यांनंतर पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर आता पोलीस आरोपीला पकडण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहेत.

काय आहे प्रकरण
पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे कि,तिचे वय ३१ वर्षे आहे आणि ती विदेशामध्ये नोकरी करते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये मॅट्रोमोनिअल साइटवर मुंबईच्या मालाडमध्ये राहणारा बिझनेसमन इस्माइल सैय्यदसोबत तिची मैत्री झाली होती. त्याने त्याच्या प्रोफाइलमध्ये त्याचे वय ३५ सांगितले होते. काही दिवसातच दोघांचा निकाह ठरला. १५ सप्टेंबरला हा निकाह करण्याचे ठरले होते. तरुणीने सांगितले, माझा होणारा पती इस्माइल १५ सप्टेंबरला मुंबईहून भोपाळला आला होता. त्याच्या बोलवण्यावरून मी एका हॉटेलमध्ये गेले होते. जेव्हा मी त्याला निकाहबाबत विचारले असता काझी इथेच येणार असल्याचे त्याने सांगितले. काझीची वाट बघता बघता रात्र झाली. त्यानंतर तो म्हणाला आता फार रात्र झाली आहे तू इथेच थांब.

यानंतर आरोपीने तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले आणि लग्न न करताच मुंबईला निघून गेला. तो मुंबईला गेल्यावर पीडित तरुणीला समजले कि त्याचे वय ३५ नाही तर ५० वर्षे आहे. तरी सुद्धा तरूणी त्याच्यासोबत लग्न करण्यास तयार होती. मात्र, इस्माइलने लग्नास नकार दिला. तसेच तिने सांगितले कि ती गेल्या ९ महिन्यांपासून त्याच्यामागे लग्नासाठी तगादा लावत आहे. पण तो तयार नाही.अखेर शेवटी वैतागून तिने पोलिसांत त्याची तक्रार दिली. यानंतर तरूणीची तक्रार नोंदवून आरोपीविरोधात छेडछाड, धमकी देणे आणि जबरदस्ती करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीचा मुंबईचा पत्ता लागला असून त्याला पकडण्यासाठी लवकरच एक टीम मुंबईला रवाना होणार आहे अशी माहिती कोहेफिजा पोलीस स्टेशनचे पीआय अनिल वाजपेयी यांनी दिली आहे.