हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस याच्यासोबत सत्तास्थापन केली. तसेच मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर चिन्ह व पक्षाचे नावही घेतल्यानंतर शिंदेंकडून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 40आमदार फोडल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ असलेल्या सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई यांनी आपल्या गटात घेतले आहे. देसाईंचे पुत्र भूषण देसाई यांनी नुकताच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलयामुळे आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित बाळासाहेब भवनात पक्ष प्रवेश केला आहे. भूषण देसाई यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. भूषण देसाई यांच्या प्रवेशामुळे आता देसाई यांच्या घरात फूट पडली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढत आहेत तर दुसरीकडे शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे.
मुंबई येथे पत्रकार परिषद व जाहीर पक्षप्रवेश https://t.co/Ephg2cpHGj
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 13, 2023
विशेष म्हणजे सत्तेवर असलेल्या भाजपमधील आमदार प्रसाद लाड यांनी भूषण देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. चार महिन्यापूर्वी लाड यांनी वसुलीचे गंभीर आरोप करत भूषण देसाई यांच्यावर एजंटगिरी करत असल्याचे म्हंटले होते. त्यापासून भूषण देसाई चांगलेच चर्चेत आले होते. आता देसाईंनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरेंसाठी हा धक्का मानला जात आहे.