तमाशा कलावंताच्या गाडीला मोठा अपघात : टेम्पोत 20 कलावंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कासच्या घनदाट जंगलात बुधवारी दि. 22 रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील तमाशा कार्यक्रम झाल्यानंतर कराडकडे येताना जावळी तालुक्यातील अंधारी गावच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. तमाशा कलावंत कमल कराडकर यांच्या टेम्पोला (एम. एच -11 एम- 4582) अपघात झाला. यावेळी टेम्पोत एकूण 15 ते 20 कलाकार होते.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गोगवे, वेंगळे येथील कार्यक्रम झाल्‍यानंतर कराडच्या दिशेने टेम्पो येत असताना अंधारी गावच्या हद्दीत आल्यावर गाडीतील डिझेल संपल्‍याने चालकाने टेम्पो उताराच्या बाजूस लावला. त्यानंतर त्यांनी बामणोली येथे जाऊन डिझेल आणले. डिझेल टेम्पोत टाकून परत कराडकडे जाणार होते. चालकाने टेम्‍पाे सुरु केला. मात्र, मागे तीव्र उतार असल्याने चालकाला टेम्‍पाेचा ब्रेक लागला नाही. त्यामुळे टेम्‍पाे मागे उताराला जावून अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत काेणतीही जीवित हानी झाली नाही.

अपघातात टेम्पोतील 5 जण जखमी झाले. त्‍यांना बामणोली आरोग्य केंद्राच्या 108 रुग्णवाहिणकेने सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्‍यात आले, अशी माहिती बामणोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांनी दिली.