बीजिंग । चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या नियामकाने राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन चायना टेलिकॉम लिमिटेडचे एक युनिट यूएस मार्केटमधून हद्दपार केले आहे. चायना टेलिकॉम लिमिटेड ही चीनमधील तीन मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे.
मंगळवारी फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनच्या आदेशानुसार चायना टेलिकॉम कॉर्पोरेशनने 60 दिवसांच्या आत यूएसमधील देशांतर्गत आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय सेवा बंद करणे आवश्यक आहे.
कमिशनने म्हटले आहे की बीजिंग कंपनीचा वापर अमेरिककम्युनिकेशन लपवण्यासाठी किंवा रोखण्यासाठी करू शकते. याशिवाय अमेरिकेच्या विरोधात हेरगिरी आणि इतर हानिकारक कारवायांमध्ये सामील होण्याची भीती होती.
चीनमधील सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक
हे उल्लेखनीय आहे की, चायना टेलिकॉम लिमिटेड ही चीनमधील सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. 2019 मध्ये, कंपनीचे जगभरात 33.5 कोटी ग्राहक होते. चायना टेलिकॉम ही जगातील सर्वात मोठी फिक्स्ड लाइन आणि ब्रॉडबँड ऑपरेटर असल्याचा दावा केला जात आहे. ते अमेरिकेतील चिनी सरकारच्या कार्यालयातही सर्व्हिस देते. कंपनीचे लक्ष अमेरिकेतील 40 लाख चिनी अमेरिकन लोकांवर आणि दरवर्षी येणाऱ्या 20 लाख पर्यटकांवर होते.