Wednesday, February 8, 2023

BIG BOSS : सातारचा बच्चन किरण माने अंतिम फेरीत

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
गेल्या तीन महिन्यापासून राज्यभर गाजत असलेल्या कलर मराठी (Color Marathi) वरील बिगबॉसमध्ये (Big Boss) सातारचा (Satara) बच्चन किरण माने (Kiran Mane) याने आपल्या अभिनयाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अंतिम फेरीत इंन्ट्री केली आहे. आता किरण मानेच बिगबॉची ट्रॉफी जिंकेल, अशी अपेक्षा देखील सर्व सातारकरांना असून त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थन ही वाढू लागले आहे.

बिगबॉस म्हंटलं की, सातारचे नाव जोडले गेले नाही तर नवलच. कारण सातारच्या पोराणींचं आजवर बिगबॉसचा शो गाजवला आहे. आज किरण माने सारखा ग्रामीण भागातील सातारकराने अंतिम फेरीत प्रवेश करून ते अधोरेखीत केले आहे. या अगोदर बिगबॉस म्हंटलं की, सातारचा अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांचे नाव राज्यभर गाजले. तर बिचुकलेंच्या लोकप्रेतेने त्यांना थेट हिंदी बिगबॉसचे ही दरवाजे खुले झाले. मात्र, त्याला अंतिम फेरीत जाता आले नाही. पण त्यांनी बिगबॉसच्या माध्यमातून राज्यभर मोठी हवा केली. आता त्यांच्या पाठोपाठ सातारचा बच्चन किरण माने यांची ही हवा बिगबॉसमध्ये पाहिला मिळत आहे. आपल्या मनातल्या भावनांना वाट करून देत अभिनयाच्या जोरावर कष्टाने सातारा टू मुंबई गाठलेल्या ग्रामीण भागातल्या किरण मानेंनी बिगबॉस या शोच्या माध्यमातून देखील आपली वेगळी ओळख महाराष्ट्राला करून दिली आहे.

- Advertisement -

अनेक चित्रपटातून आणि टीव्ही सिरीयल मधून अभिनय करत, सातारचे नावलौकिक वाढवणारा कष्टाळू अभिनेता अशी अोळख किरण माने यांची आहे. आज बिगबॉस सारख्या एक मोठ्या रियालटी शो च्या अंतिम फेरीत गेले आहेत. आता बिगबॉसची अजिंक्यपदाची ट्रॉफी सातारला मिळते का हेच पाहावे लागणार आहे. उद्या 8 जानेवारीला होणाऱ्या अंतिम फेरीत सातारच्या किरण मानेंनी इंन्ट्री केल्याने त्यांनीच बिगबॉसची ट्रॉफी जिंकवी, अशी अपेक्षा सर्व सातारकरांना लागून राहिली आहे.