याला म्हणतात ‘परफेक्ट’ ड्रायव्हर…; पट्ठ्यानं विना चाकांचाच चालवला ट्रक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर आपल्या हटके व्हिडीओमुळे अनेकजण फेमस होतात. काही जण तर दररोज आपले हटके व्हिडीओ बनवून त्यावर शेअर करतात. सध्या एक हटके व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तो म्हणजे महामार्गावर एक ट्रक ड्रॉयव्हर चक्क पुढील चाके नसणारा ट्र्क महामार्गावरून चालवत आहे. त्याच्या या ड्रायव्हिंगने अनेकांनी लक्ष वेधले आहे.

महामार्गावरून चाके नसणारा तर्क चालवताना पाहून त्याबाजूने जाणाऱ्या काही नियत वाहनचालकांनी त्याचा व्हिडिओही आपल्या मोबाईलमधील कॅमेऱ्यात काढला आहे. अशा या धडाकेबाज आणि हटके स्टाईलने ट्रक चालवणाऱ्या ड्रॉयव्हरचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

https://www.instagram.com/p/CmoaZWshJ4p/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

तसे पाहिले तर महामार्गावरून वाहने चालवताना खूप काळजी घ्यावी लागते. एखादे वाहन पाठीमागून कधी येईल आणि आपल्याला ठोकेल या भीतीने अनेकजण महामार्गाच्या कडेने गाडी चालवतात. तर काहीजण दुचाकी आणि चारचाकीतुन स्टंट करताना पहायला मिळतात. मात्र, या सर्वात व्हायरल झालेल्या या तर्क ड्रॉयव्हरच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.