हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आला आहे. देशभरातील टोल नाक्यांवर (Toll Plaza) डिजिटल आणि आयटी पेमेंट सिस्टमला चालना (Digital Payment) देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) ने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 1 जानेवारीपासून जुन्या गाड्यांना देखील फास्टॅग लावणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढलं आहे. M आणि N कॅटेगरीमधील वाहनांनादेखील फास्टॅगचा स्टीकर लावावा लागेल. केंद्र सरकारने सेंट्रल व्हेईकल रुल्समध्ये (CMVR, 1989) बदल केले आहेत.
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार १ डिसेंबर २०१७ नंतर खरेदी करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांच्या सर्व रजिस्ट्रेशनसाठी ‘फास्ट टॅग’ ला अनिवार्य केले गेले होते आणि ‘फास्ट टॅग’चा पुरवठा वाहन निर्माता किंवा डीलरद्वारे केला जात होता. याचबरोबर हे देखील अनिवार्य करण्यात आले होते की, फिटनेस प्रमाणपत्राचे रिन्युअल केवळ ट्रान्सपोर्ट वाहनांवर ‘फास्ट टॅग’ लावल्यानंतरच केले जाईल. १ ऑक्टोबर २०१९ पासून नॅशनल परमिट वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ लावणे बंधनकारक करण्यात आले होते.
FASTags to be mandatory for all 4-wheelers from Jan 1, 2021
Read @ANI Story | https://t.co/WvsdKoXrvp pic.twitter.com/icswpzMMQy
— ANI Digital (@ani_digital) November 7, 2020
मंत्रालयाचे असे म्हणणे की, मान्यताप्राप्त ‘फास्ट टॅग’ थर्ड पार्टी इंश्युरन्स घेताना देखील बंधनकारक असेल. हे इंश्युरन्स सर्टिफिकेटच्या पाहणीवरून होईल, ‘फास्ट टॅग’ चा आयडी डिटेल्स जिथे पाहिल्या जाईल. १ एप्रिल २०२१ पासून हा निर्णय लागू होईल.
फास्टॅग कसा काढायचा?-
फास्टॅग काढण्यासाठी देशातल्या 22 राष्ट्रीयकृत बँकांचा पर्याय देण्यात आला आहे.
- या बँकांमध्ये जाऊन तुम्हाला फास्टॅग तुमच्या खात्याशी लिंक करता येईल.
-
बँकेचं खातं जोडताना केवायसी (Know Your Customer) असणं आवश्यक आहे.
-
Paytm, Amazon pay, Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank या ई-कॉमर्स
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’