गृहमंत्र्यांचा मोठा निर्णय ! MPSC 2017-18 च्या ‘या’ पदाच्या पात्र उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवणार

0
36
Dilip Walse Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात 2018 आणि 2017 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक सरळ सेवा परीक्षा आणि पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा मध्ये एकूण पात्र 737 उमेदवारांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मोठा दिलासा दिला आहे. त्यांना आता जून २०२१ मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करून दिली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा – २०१८ आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा – २०१७ मधील एकूण पात्र ७३७ उमेदवारांना जून २०२१ पासून मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय गृहमंत्र्यांनी जाहीर केला.सदरचे प्रशिक्षण हे कोरोना परिस्थितीच्या अधिन राहून तसेच राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांच्या अधिन राहून सुरु करण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here