हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज ठाकरेंनी नागपूर शहर आणि ग्रामीण शहरातील पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. दसरा झाल्यानंतर आपण नवी कार्यकारिणी जाहीर करेन अशी माहिती त्यांनी दिली. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
काल मी सर्व पदाधिकाऱ्यांना भेटलो. पक्षाच्या अंतर्गत बदलांबाबत आणि पक्षविस्ताराबाबत चर्चा केली. यानंतर मी नागपुरातील मनसेची सर्व प्रमुख पदे बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे असं राज ठाकरे म्हणाले. दसऱ्या नंतर नवी कार्यकारिणी जाहीर करेन. त्यामध्ये आत्ताची काही लोक आणि काही नवीन लोकांना संधी देण्यात येईल असं राज ठाकरेंनी सांगितले. २७ ला पक्षाची मुंबईत बैठक असून त्यानंतर याबाबत निर्णय होईल असही ते म्हणाले.
यावेळी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा २०१९ मध्ये झालेल्या महाविकास आघाडीवर टीका केली. कोण कोणासोबत जातंय हेच समजत नाही. २ पक्ष एकत्र लढले आणि निवडणुकींनंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. बंद खोलीत मला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिल याला काय अर्थ आहे असं म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.