नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळात घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. या दरम्यान, अनुराग ठाकूर यांनी ग्रामीण भारतासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये त्यांनी जाहीर केले आहे की,’आता जनावरांसाठीही ऍम्ब्युलन्स धावेल.’
याशिवाय ते म्हणाले की,” राष्ट्रीय आयुष मिशन 2025-26 अंतर्गत नागरिकांना होणारे फायदे यापुढेही कायम राहतील. त्याअंतर्गत आयुष महाविद्यालया बरोबरच आयुष रुग्णालयेही बांधली जातील. 2021-22 ते 2025-26 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय आयुष मिशन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एकूण 4607 कोटी रुपये खर्च केले जातील.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की,”देशभरात 12,000 आयुष हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स सुरू केले जातील. 6 आयुष महाविद्यालये, 12 आयुष पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टीट्यूट बांधण्यात येणार असून 10 अंडर ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटच्या पायाभूत सुविधा अपग्रेड केल्या जातील.
केंद्रीय कर्मचार्यांसाठी चांगली बातमी, DA मध्ये 11 टक्के वाढ
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्यांना एक मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यावरील बंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता म्हणजेच DA 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. अशा प्रकारे, DA मध्ये एकूण 11 टक्के वाढ झाली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा