हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध राज्यात घालण्यात आले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना ही केवळ पंधरा टक्के उपस्थिती निश्चित केली आहे मात्र आता धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय विभागाने एक अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये दिव्यांग कर्मचारी, अधिकारी यांना कार्यालयात उपस्थित राहन्यामध्ये सूट देण्यात आली आहे. त्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संबंधित विभागातर्फे केला जाणार आहे.
याबाबतची माहिती स्वतः सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून दिलेली आहे. दिव्यांग व्यक्तीचे आरोग्य आणि इतर सुविधांचा विचार करून त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यासंबंधीच्या शासन आदेश देखील त्यांनी पोस्ट केला आहे.
राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी 15% उपस्थिती निश्चित केलेली आहे,दिव्यांग व्यक्तींचे आरोग्य व अन्य सुविधांचा विचार करून दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा संबंधित विभाग करून देतील. pic.twitter.com/1S5kUam8qQ
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 3, 2021
दरम्यान, कोरोनाच्या काळात सध्या सरकारी कार्यालयांना देखील मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. त्यानुसार सरकारी कार्यालयांमध्ये रोटेशन पद्धतीनुसार सरकारी कर्मचारी काम करत आहेत. धनंजय मुंडे यांच्या निर्णयामुळे मात्र दिव्यांग व्यक्तींना दिलासा मिळणार आहे यात शंका नाही.