हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. आज, बुधवार दि. २१ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत अनके मोठे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये पोलिसांसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे, पोलिसांच्या सुट्टयांमधे वाढ करून शिंदे- फडणवीस सरकारने पोलिसांना खुश केलं आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय-
1) धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मान्यता
2) राज्यातील वर्ग-३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणार
3) आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ राज्यातील वर्ग-३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणार✅ आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 21, 2022
4) वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देणार. सुधारित खर्चास आणि राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.
5) बार्शी येथील लक्ष्मी सोपान अॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी या खाजगी बाजार समितीचा कांदा अनुदान योजनेत समावेश
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन✅ नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाकरिता भाडे तत्त्वावर जागा घेण्याचा निर्णय
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 21, 2022
6) सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन
7) नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाकरिता भाडे तत्त्वावर जागा घेण्याचा निर्णय
8) राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करणार. त्यामुळे शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज, कर्ज हमी याबाबतीतल्या सार्वजनिक हिताचे रक्षण होणार.
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करणार. त्यामुळे शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज, कर्ज हमी याबाबतीतल्या सार्वजनिक हिताचे रक्षण होणार.✅ पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ पासून २० इतक्या वाढवल्या
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 21, 2022
9) पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ पासून २० इतक्या वाढवल्या
10) भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार; पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाचे कामकाज २८ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार.