मोठी बातमी : अनिल देशमुखांच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम मुंबईत दाखल

0
38
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत अॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची CBI चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता CBIची टीम आताच मुंबईत दाखल झाली आहे. काही वेळातच याबाबतचा तपास सुरु केला जाईल.

मुंबई हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param bir Singh) यांनी मुंबई हायकोर्टात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आणखी तीन याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा दिलेला निर्णय ठाकरे सरकारसाठी धक्का मानला जात आहे. मुंबई हायकोर्टाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले, तर परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here