नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. असे मानले जात आहे की, EPFO सदस्यांना लवकरच PF वर व्याज मिळणार आहे. EPFO दिवाळीपूर्वी PF व्याज खात्यात ट्रान्सफर करू शकतो. EPFO चे 6.5 कोटी ग्राहक PF व्याजाची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी त्यांना सरकारकडून मोठी भेट मिळू शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की,”सरकारकडून कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात महागाई भत्ता कधी येईल आणि त्याचवेळी EPFO चे व्याजही खात्यांमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे.
सरकार मान्यता देईल
EPFO च्या केंद्रीय मंडळाने 8.5% व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. EPFO ने 8.5% व्याजावर अर्थ मंत्रालयाची मंजुरी मागितली आहे. आता अशी अपेक्षा आहे की, लवकरच त्याला सरकारकडून मंजुरी मिळेल. आर्थिक मंत्रालयाने 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी 8.5% व्याजाने EPFO मंजूर करताच ते कर्मचारी आणि पेन्शनहोल्डर्सच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करेल. हे पैसे दिवाळीपर्यंत येतील अशी अपेक्षा आहे.
PF बॅलन्स कसा तपासायचा
1. SMS द्वारे- जर तुमचा UAN क्रमांक EPFO मध्ये रजिस्टर्ड असेल, तर तुम च्या PF बॅलन्सची माहिती मेसेजद्वारे मिळेल. यासाठी तुम्हाला EPFOHO टाईप करून 7738299899 वर पाठवावे लागेल. तुमच्या PF ची माहिती मेसेजद्वारे मिळेल. जर तुम्हाला हिंदी भाषेत माहिती हवी असेल तर तुम्हाला EPFOHO UAN लिहून पाठवावी लागेल. PF बॅलन्स जाणून घेण्यासाठी ही सर्व्हिस इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि बंगालीमध्ये उपलब्ध आहे. PF बॅलन्स साठी, आपला UAN, बँक खाते, पॅन आणि आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
2. मिस्ड कॉलद्वारे बॅलन्स जाणून घ्या- तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर, PF चा तपशील EPFO च्या मेसेजद्वारे उपलब्ध होईल. इथे तुमचा यूएएन, पॅन आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे.
3. वेबसाईट द्वारे- EPF पासबुक पोर्टल ला भेट द्या आपला बॅलन्स ऑनलाईन तपासण्यासाठी आपला UAN आणि पासवर्ड वापरून या पोर्टलवर लॉग इन करा. यामध्ये, Download/View Passbook वर क्लिक करा आणि नंतर तुमच्या समोर पासबुक उघडेल ज्यामध्ये तुम्ही बॅलन्स पाहू शकता.