हॅलो महाराष्ट्र । भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने (IRDAI) ने पॉलिसीधारकांसाठी विमा पॉलिसीच्या ऑनलाइन खरेदीसाठी Video KYC ची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. IRDAI ने विमा कंपन्या आणि एजंटांना ऑनलाईन पॉलिसी देण्यास मान्यताही दिली आहे. आता ग्राहक KYC व्हिडिओद्वारे बँकेत न जाता किंवा विमा अधिकाऱ्याच्या संपर्कात न येता पॉलिसी खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतील.
विमा अधिकारी डिजिटल सिग्नेचरची पडताळणी करतील
ऑनलाईन पॉलिसीमध्ये, विमा अधिकाऱ्यास ग्राहकाच्या कागदपत्रांवरील सिग्नेचर मान्य करण्यासाठी डिजिटल मोडचा वापर करण्याची परवानगी दिली जाईल. यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि भांडवली बाजार नियामक सेबी (SEBI) यांनीही KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यासाठी व्हिडीओ-आधारित उपकरणे वापरण्यासाठी बँक आणि म्युच्युअल फंड व्यवस्थापकांना (Mutual Funds) मान्यता दिली आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) च्या वितरणासाठी Video KYCला मान्यता दिली आहे.
Video KYC अशा प्रकारे केली जाईल
> विमा कर्मचारी किंवा अधिकृत प्रतिनिधी घरी लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे ग्राहकांची संपूर्ण माहिती घेतील.
> अधिकृत ऍपद्वारे पॉलिसीधारक विमा कंपनीच्या कर्मचार्यांशी जोडले जातील आणि IRDAI च्या मार्गदर्शक सूचनांनुसार Video KYC ची प्रक्रिया सुरू करतील.
> दुसर्या पर्यायात पॉलिसीधारकाला अधिकृत वेब लिंक पाठविली जाईल, ज्याद्वारे विमा कर्मचारी ग्राहकांची माहिती गोळा करेल.
> यावेळी ग्राहकाला आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स पैकी एक सादर करावे लागेल. जर ग्राहक डिजीलॉकरची सुविधा वापरत असेल तर तो डिजिटल सिग्नेचर केलेली कॉपी सादर करू शकतो.
> Video KYC च्या प्रक्रियेमध्ये ग्राहक ही कागदपत्रे फोटोच्या रूपात शेअर करू शकतात किंवा ते ई-साइन सिस्टमद्वारे कागदपत्रे स्कॅन करुन शेअर करू शकतात.
> Video KYC दरम्यान ग्राहकांचे लोकेशन, तारीख आणि वेळ स्टॅम्पही नोंदविला जाईल. यामध्ये जिओटॅगिंग देखील अनिवार्य असेल.
> पॉलिसीधारक भारतात असेल तरच ही Video KYC ची प्रक्रिया वैध असेल.
Video KYC ग्राहकांना अशा प्रकारे मदत करेल
> कोरोना विषाणूच्या देशातील सद्यस्थितीनुसार ही प्रक्रिया ग्राहकांना सोयीची होईल.
> यासाठी पॉलिसी खरेदी प्रक्रियेसह कोणत्याही ग्राहकांना KYC व्हेरिफिकेशनसाठी विमा कार्यालयात जावे लागणार नाही.
> विमा कंपन्या या प्रक्रियेत आत्ताच काही बदल करतील. यानंतर, ग्राहक आणि कंपनीने शेअर केलेले लिंक विमाधारकाशी थेट कनेक्ट होऊ शकतील.
> KYC ची कागदपत्रे ऑनलाईन शेअर करण्याबरोबरच KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना समोरासमोर येण्याऐवजी Video मधूनच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात.
> Video KYC व्हेरिफिकेशनसाठी ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.