उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! वार्षिक उत्पन्न मर्यादा २.५ लाखांवरून ८ लाख रूपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मोठी माहिती समोर आली आहे. यापैकी अनेक विद्यार्थी शासकीय तसेच निमशासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेत असतात. आता या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेश घ्यायचा असेल तर त्याकरिता कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लेखांवरून ८ लाखांवर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

नवाब मलिक यांनी म्हंटले आहे की, ‘ उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतिगृहात विनाशुल्क प्रवेश घेण्यासाठी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाखांवरून आता ८ लाख रूपये करण्याचा निर्णय. वसतिगृहात खोलीभाडे, पाणी, वीज आदी सुविधांचे शुल्क माफ असेल. त्यामुळे निश्चितच राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान , मराठा आरक्षणाबाबत संभाजी राजे सर्व नेत्यांना भेट आहेत. याबाबत मलिक याना प्रश्न विचारला असता , मंत्री अशोक चव्हाण ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगली भूमिका घेतील, मराठा समाजाला न्याय मीळवुन देण्यासाठी राष्ट्रवादी काँगेस पक्ष सुरुवातीपासूनच कटिबद्ध असल्याचे देखील अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

Leave a Comment