हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता अॅमेझॉन इंडिया (Amazon) च्या माध्यमातून ट्रेनची तिकिटेदेखील बुक करता येतील. यासाठी अॅमेझॉन आणि IRCTC ने भागीदारी केली आहे. अॅमेझॉन आपल्या वेबसाइटवरून तिकिट रिझर्वेशन करण्यावर ट्रेनच्या पहिल्या तिकिट बुकिंगवर 10% कॅशबॅक देईल, जे 100 रुपयांपर्यंत असेल. त्याचबरोबर प्राइम मेंबर्सना 12 टक्के कॅशबॅक मिळेल. ही कॅशबॅकची ऑफर मर्यादित कालावधीसाठीच वैध आहे. नवीन फीचरनुसार कंपनीने प्रारंभिक कालावधीसाठी सर्व्हिस आणि पेमेंट गेटवे ट्रान्सझॅक्शन चार्जेस मध्ये सूट दिली आहे. ही मर्यादित कालावधीची ऑफर असेल. अॅमेझॉनची ट्रेन तिकीट बुकिंग फीचर अँड्रॉइड आणि आयओएस अॅप युझर्ससाठी देखील उपलब्ध आहे.
एकाच वेळी किती तिकिटे असतील बुक करू शकाल
अॅमेझॉन प्लॅटफॉर्मवर आपण एकावेळी 6 लोकांसाठी ट्रेनची तिकिटे बुक करू शकाल. तत्काळ तिकिट बुकिंगच्या बाबतीत, एका ट्रान्सझॅक्शनमध्ये 4 लोकांसाठीच्या तिकिटांचे रिझर्वेशन केले जाऊ शकतात. तसेच प्रवासाच्या 120 दिवस आधी तिकिटे देखील आगाऊ बुक करता येतील.
सुमारे दीड वर्षापूर्वी, अॅमेझॉनने आपल्या प्लॅटफॉर्मद्वारे विमान फ्लाइटसच्या तिकिटांची बुकिंग करण्याची सुविधा सुरू केली. त्यानंतर, नोव्हेंबर 2019 मध्ये, बसच्या तिकिट बुकिंगचे फीचर जोडले गेले. आता कंपनीने ग्राहकांना ट्रेनची तिकिटे बुक करण्याची सुविधादेखील दिली आहे.
अॅमेझॉन वर ट्रेनची तिकिटे कशी बुक करावीत
अॅमेझॉन पेवर आणखी एक ट्रॅव्हल कॅटेगिरी जोडली गेली आहे, जेथे ग्राहकांना फ्लाइट, बस आणि ट्रेनच्या तिकिटांच्या बुकिंगसाठी एक स्टॉप-शॉप उपलब्ध आहे. तुम्हाला या अॅपवर पीएनआर स्टेटस चेकिंग, लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग, तिकिट डाउनलोड करणे किंवा रद्द करण्याची सुविधा देखील मिळेल. त्याचबरोबर अॅमेझॉन पेद्वारे पैसे भरणाऱ्या ग्राहकांना तिकीट रद्द झाल्यावर त्वरित रिटर्न देखील मिळू शकेल. आपल्या अॅमेझॉन अॅपवरील अॅमेझॉन पे टॅबमध्ये ट्रॅव्हल कॅटेगरी अंतर्गत फ्लाइट, बस आणि ट्रेनचे तिकीट बुकिंग फीचर उपलब्ध आहे.
अॅमेझॉन वर त्वरित रिटर्न मिळेल – अॅमेझॉन पे बॅलन्सचा वापर करुन बुकिंग केलेली रेल्वेची तिकिट रद्द केल्यास किंवा बुकिंग अयशस्वी झाल्यास ग्राहकांना त्वरित रिटर्न मिळेल.
ट्रेनची तिकिटे कशी आणि कुठे मिळतील – अॅमेझॉन ची ट्रेन तिकीट बुकिंग रिटर्न Android आणि iOS दोन्ही युझर्ससाठी उपलब्ध आहे. अॅमेझॉन अॅपवरील अॅमेझॉन पे टॅबमध्ये ट्रॅव्हल कॅटेगरी अंतर्गत फ्लाइट, बस आणि ट्रेनचे तिकिट बुकिंग फीचर उपलब्ध आहे.
लोक रेल्वे प्रवासाचा मार्ग, प्रवासाची तारीख इत्यादी सहजपणे निवडू शकतात आणि सर्व उपलब्ध गाड्यांची लिस्ट त्यांच्या समोर येईल.
पेमेंटसाठी अॅमेझॉन पे बॅलन्स / अॅमेझॉन पे आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड किंवा अन्य डिजिटल पेमेंट मिडीयम वापरले जाऊ शकते. अॅमेझॉन कडून बुक केलेले ट्रेनचे तिकीट रद्द करण्यासाठी ‘योर ऑर्डर्स’ सेक्शनमध्ये जाऊन हे केले जाऊ शकते. बुक केलेले तिकीटही या सेक्शनमध्ये दिसेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.