स्लीपर कोच गाड्यांना AC कोचमध्ये बदलण्याची रेल्वेची तयारी, ‘ही’ नवीन योजना काय आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे आता नवीन पावले उचलत आहे. यावेळी रेल्वे सामान्य नागरिकांना कमी भाड्याने AC कोचमध्ये प्रवास करण्याची परवानगी द्यायची योजना आखत आहे. यासाठी रेल्वेने स्लीपर व गैर-आरक्षित श्रेणी (अनारक्षित) कोचना AC कोचमध्ये रुपांतरित करण्याची योजना तयार केली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, रेल्वे याद्वारे देशभरात AC गाड्या चालवण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे कमी खर्चात प्रवाशांना उत्तम प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपग्रेड केलेल्या स्लीपर कोचला इकोनॉमिकल एसी 3-टियर असे म्हटले जाईल.

एसी 3-टियरमध्ये 72 बर्थ ऐवजी 83 बर्थ असतील.
इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ट्रेन कोच फॅक्टरी कपूरथळाला स्लीपर कोचना AC कोचमध्ये रूपांतरित करण्याचे काम देण्यात आले आहे. सूत्रांनी वृत्तपत्राला सांगितले की, या नवीन आइकोनॉमिकल एसी 3-टियरमध्ये 72 बर्थ ऐवजी 83 बर्थ असतील. सुरुवातीला या कोचना एसी-3 टियर टूरिस्ट क्लास देखील म्हटले जाईल. या गाड्यांचे भाडेदेखील स्वस्त असणार आहे, जेणेकरून प्रवासी यामधून प्रवास करू शकतील. पहिल्या टप्प्यात असे 230 कोच तयार केले जातील.

सुमारे 3 कोटी रुपये खर्च केले जातील
वृत्तपत्राच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक कोच बनविण्यासाठीची अंदाजे किंमत 2.8 ते 3 कोटी रुपये असेल, जे एसी थ्री-टियर बनविण्याच्या खर्चापेक्षा दहा टक्के जास्त आहे. मात्र, जास्त बर्थ आणि मागणीमुळे रेल्वेला इकॉनॉमिक एसी थ्री-टियरकडून चांगल्या कमाईची देखील अपेक्षा आहे. याशिवाय अनारक्षित सामान्य वर्ग कोचचेही 100 आसनी AC कोचमध्ये रुपांतर केले जाईल. यासाठीचे डिझाइन फायनल करण्यात येत आहे.

अशी योजना यापूर्वीही तयार करण्यात आली आहे
2004-09 दरम्यान, UPA-I सरकारच्या काळातही इकोनॉमिकल एसी 3-टियर क्लास कोच तयार करण्याची योजना केली गेली होती. त्याच वेळी गरीब रथ एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या, ज्याला एसी इकॉनॉमी क्लास म्हणतात. मात्र, प्रवाश्यांनी प्रवासादरम्यान अडचणी येत असल्याबद्दल सांगितले. त्याचबरोबर या ट्रेनमध्ये गर्दीची परिस्थितीही सुरू झाली. यानंतर अशा कोचचे उत्पादन थांबविण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment