शरद पवारांना मोठा धक्का! कर्जतच्या माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अजित पवारांनी बंड केल्यापासून राष्ट्रवादी पक्षाला गळती लागल्याचे दिसत आहे. यामध्ये आता शरद पवार एकटे पडत चालले असल्याचे देखील म्हणले जात आह. अशातच शरद पवारांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. कर्जतचे माजी आमदार शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या शनिवारी नागपूरमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाचे माजी आमदार सुरेश लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कर्जत मतदारसंघाचे माजी आमदार असणारे सुरेश लाड शरद पवार यांच्या गोठ्यातील महत्त्वाचा माणूस होता. परंतु आता यांच माणसाने शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे त्या शनिवारी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सुरेश लाड भाजपमध्ये प्रवेश करतील. महत्वाचे म्हणजे सुरेश लाड यांच्यासोबत नगरसेवक, तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे काही सदस्य देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, गेल्या 45 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सुरेश लाड यांची राजकीय मैत्री होती. मध्यंतरी झालेल्या राजकीय मतभेदांमुळे लाड आणि तटकरे यांच्यातील दुरावा वाढला होता. त्यानंतर आता थेट शरद पवार गटाकडून फारस बळ मिळत नसल्याचे म्हणत सुरेश लाडी यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर सुरेश लाड यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा फटका शरद पवार गटाला बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.