पुन्हा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी करणार पहिले हे काम; शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यातील शेतकरी पीएम किसान सन्मान (PM Kisan Sanman Nidhi Yojana) योजनेच्या सतराव्या हाताची आतुरतेने वाट पाहत आहे. परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या योजनेची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे. दुसऱ्या बाजूला, एक्झिट पोलच्या आकडेवारीमधून देशात पुन्हा एकदा भाजपचेच सरकार स्थापित होईल, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब खरी ठरल्यास सत्तेत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना शपथविधी पूर्वीच किसान योजनेचा हप्ता देतील असे म्हटले जात आहे.

या कालावधीत जमा होणार 17 वा हप्ता

येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे हा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यात भाजपचे सरकार पुन्हा येणार असल्याचे निश्चित झाले की, या योजनेचा 17 वा हप्ता 4 जूननंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. थोडक्यात, किसान योजनेचा 17 वा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर जारी केला जाऊ शकतो. मात्र, केंद्र सरकारने अद्याप तारीख निश्चित केलेली नाही.

यापूर्वी पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात आला होता. पीएम-किसान योजनेच्या 16 व्या हप्त्यात 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 21,000 कोटींहून अधिक रक्कम जारी करण्यात आली होती. तर योजनेचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी मोदी सरकारने जारी केला होता. त्यामुळे आता राज्यातील शेतकरी 17 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता हा हप्ता मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरच जारी करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.