हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साऱ्या तरुणाईला अवघ्या काही दिवसात पुण्याचा रॅपर असणाऱ्या एमसी स्टॅनने वेड लावले आहे. बिग बॉसच्या घरात आपल्या अनोख्या शैलीने त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ‘बिग बॉस’ सोळाचा विजेता एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस चांगलाच उंचावत असताना आता त्यानेआपण लग्न करत असल्याचे सांगितले. एवढंच नाही तर त्याने गर्लफ्रेंडसोबतचा वेडिंग प्लॅनही सांगितलं आहे.
https://www.instagram.com/reel/CoO1Y0CBSpV/?utm_source=ig_web_copy_link
पुण्याचा रॅपर असणाऱ्या एमसी स्टॅनने बिग बॉसच्या घरातून एक नवी ओळख प्राप्त केली आहे. ट्रॉफी जिंकत एमसीने आपली फॅनफॉलोईंग दाखवून दिली. एमसी स्टॅन आपल्या गर्लफ्रेंडला प्रेमाने बुबा अशी हाक मारतो. आपलं बुबावर प्रचंड प्रेम असल्याचं एमसीने वेळोवेळी कबुल केलं आहे.
https://www.instagram.com/reel/CocaYjRDvQ-/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान आता एमसी स्टॅनने बुबासोबतच्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे. एमसी स्टॅनने आपण गेली चार-पाच वर्षे बुबासोबत नात्यात असल्याचा खुलासा केला असून आपण येत्या एक-दीड वर्षात बुबासोबत लग्नगाठ बांधायची असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लवकरच एमसी स्टॅन गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकलेला पाहायला मिळणार आहे.