पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंत राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची २५ सप्टेंबर रोजी घोषणा करण्यात आली. त्यामुळे बिहारमध्ये काय निकाल येतात याकडे सगळ्याचंच लक्ष लागलं आहे. अशा वेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणारे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीनं बिहार निवडणुकीत उडी घेतली आहे. बिहार विधानसभा लढवत असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी . खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमनं केली होती. त्यापाठोपाठ आज अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनंही बिहार निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं.
“बिहार विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रटिक अलायन्समध्ये (पीडीए) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीत अन्य पक्षांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आघाडीच्या माध्यमातून एनडीएच्या अमानवी सरकार सत्तेवरून हटवून मानतावादी सरकार स्थापन करू,” असा विश्वास वंचित आघाडीनं व्यक्त केला आहे.
#बिहार विधानसभा चुनाव में हमने प्रोग्रेसिव डेमोक्रेटिक अलायन्स (PDA) में शामिल होने का निर्णय लिया है।अन्य दलों को भी इस गठबंधन में शामिल करनेका प्रयास रहेगा। इस गठबंधन के माध्यम से हम #NDA की अमानवीय सरकार को गिराकर मानवतावादी सरकार स्थापित करेंगे।#BiharElections2020 pic.twitter.com/IDP93HTJTK
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 2, 2020
“बिहार विधानसभा निवडणूक जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष व प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रटिक अलायन्सचे समन्वय राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांच्यासोबत लढणार आहोत. यशवंत सिन्हा व काँग्रेसलाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आम्हाला विश्वास आहे की, मागच्या वेळेप्रमाणेच यावेळीही एनडीएचं सरकार दूर करू,” असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान, बिहारमध्ये ३ टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
पप्पू यादव की पीडीए (PDA) में शामिल हुई प्रकाश अम्बेडकर साहब की वंचित बहुचन आघाड़ी..https://t.co/IKvtpNHdXv
— VBA tweets (@VBA_tweets) October 2, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.