लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहित जोडप्याने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

Marrage
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बिहार : वृत्तसंस्था – बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका नवविवाहित जोडप्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हि घटना बिहारच्या गोपाळगंजमध्ये घडली आहे. या दोघांनी लग्नानंतरच्या मधुचंद्राच्या रात्री दोघांनी विष पिऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. हि घटना मीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यानंतर तातडीने नवविवाहित जोडप्याला अत्यवस्थ अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. 28 वर्षांची शांता देवी ही जमशेदपूर येथील सोनाटे भागातील रहिवासी असून तिचे मीरगंज येथील चंद्रिका सिंह यांच्यासोबत लग्न ठरले होते. या दोघांनी प्रेमविवाह केला होता.

या दोघांनी एका मंदिरात लग्न केले. यानंतर नवऱ्या मुलाच्या घरी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. जेवण झाल्यानंतर हे नवविवाहित जोडपे झोपायला गेले होते. घरच्यांनी सांगितल्यानुसार या दोघांनी स्वतःच्या जेवणात विष घातले होते. मात्र या दोघांनी असे धक्कादायक पाऊल का उचलले हे अजून समजू शकले नाही. हे नवविवाहित जोडपे स्वतःच्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांच्या घरातल्यांना हा प्रकार समजताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघांना आयसीयूमध्ये दाखल करुन त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले होते.

या दोघांना घरच्यांनी साबणाचे पाणी प्यायला दिले होते. साबणाचं पाणी प्यायल्याने त्यांना उलटी होईल असा अंदाज घराच्यांना आला, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. मात्र साबणाचं पाणी पिऊनदेखील त्यांच्यात काही सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे शेवटी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. या जोडप्यावर उपचार सुरु असताना रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच दोघांचे नातेवाईक नवविवाहित जोडप्याला घेऊन दुसऱ्या रुग्णालयात चांगले उपचार मिळतील असे सांगून पसार झाले. सध्या पोलीस या कुटुंबाचा शोध घेत आहेत.