राज्य सरकार अधिवेशन घेण्यापासून पळ काढतंय; सरकारकडून ओबीसी समाजाचा विश्वासघात : देवेंद्र फडणवीसांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  : कोरोनाचे कारण सांगून हे महाविकास आघाडी सरकारकडून अधिवेशन दोन दिवसांचं घेतलं जातंय.  एक प्रकारे राज्य सरकारकडून जनतेची फसवणूक केली जात आहे. सरकारकडून ओबीसी समाजाचा विश्वासघात केला जातोय. या विरोधात आमच्या शिष्ट मंडळाने राज्यपालांची भेट घेत त्यांच्याकडे तक्रार केली आहे. अधिवेशनासंदर्भात त्यांच्याशी चर्चाहि केली आहे. राज्य सरकार अधिवेशन घेण्यापासून पळ काढत आहे, अशी टीका भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी राज्यपाल भगतसिह कोशारी यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले, हे महाविकास आघाडी सरकार जनतेची फसवणूक करीत आहे. कोरोनाचे कारण सांगत जर दोन दिवस अधिवेशन घेतले जात असेल आणि त्याचा प्रचार केला जतसेल तर या सरकारला एवढंच सांग आहे कि, हे सरकार राजकीय कार्यक्रमे कसे काय घेत आहे. राज्यपालांनी पत्र पाठवल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यावी लागते. हे सरकार विधानसभा अध्यक्षांचीही ईवडणूक घेत नाही. आम्ही राज्यपालांकडे विंनती केली आहे कि, त्यांनी या सरकारकडून संवैधानिक जबाबदाऱ्या पाड पाडल्या जात नसल्याची बाब राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून द्यावी.

राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढते आहे. राज्यपालांनी पत्र पाठवल्यावर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यावी लागते. हे सरकार विधानसभा अध्यक्षांची निवडणून घेत नाही. आम्ही संवैधानिक नियमांची पायमल्ली करणं हे संविधाला मोडणं आहे, ही बाब राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये तसेच सरकाकडून संवैधानिक जबाबदाऱ्या पाड पाडल्या जात नसल्याची बाब राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देण्याची विनंती आम्ही राज्यपालांकडे केली आहे.

Leave a Comment