हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bike Accident) सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये रस्ते अपघाताच्या व्हिडिओंचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अर्थात रस्ते अपघाताची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. अनेकदा वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. अशा अपघातांच्या प्रकरणात सर्वाधिक मृत्यू हे तरुण दुचाकीस्वारांचे झाले आहेत. असे अपघात टाळता यावेत म्हणून वारंवार हेल्मेट घालून दुचाकी चालवण्याचे सल्ले दिले जातात. मात्र, तरीही लोक या सूचनेचे पालन करत नाहीत. दरम्यान, सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हेल्मेट घातल्यामुळे प्राण वाचल्याचे समोर आले आहे.
व्हायरल व्हिडीओ (Bike Accident)
प्रत्येक दिवशी रस्ते अपघाताची किमान एक बातमी तरी आपण वाचत असतो. प्रतिवर्षी अशा अपघातांची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये दुचाकीस्वारांचा सर्वाधिक समावेश असल्याने हेल्मेट घालून गाड्या चालवण्याचा सल्ला दिला जातो. सोशल मीडियावर असे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये केवळ हेल्मेट घातल्यामुळे जीव बचावल्याचे समोर आले आहे. आताही असाच एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, नागमोडी वळणाच्या रस्त्यावर काही तरुण रस्त्यावर रेसिंग करत आहेत. यावेळी एक बाईकचालक एका सायकल स्वाराला धडकतो आणि त्यानंतर तो स्वत: घसरत पुढे. दरम्यान, त्या बाईक चालकाचं डोकं बाईकखाली येत. मात्र, सुदैवाने त्याने हेल्मेट परिधान केल्यामुळे तो बचावतो. (Bike Accident) बाईकचं वजन पाहता तरुणाचा जीव काही सेकंदात जागेवर जाऊ शकला असता. मात्र, हेल्मेट परिधान केल्यामुळे त्याचा जीव बचावला. हा व्हिडीओ हेल्मेट घालणे किती सुरक्षित आहे आणि गाडी चालवताना किती सतर्क असायला हवे याचे एक उत्तम उदाहरण आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर इंस्टाग्राम हॅण्डल maharashtra_trending_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी पाहिला असून त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकाने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की, ‘असं वाटतंय.. हा हेल्मेटच्या क्वालिटीचा प्रचार करतोय, किंवा असं म्हणूया त्याचा दिवस चांगला होता’. (Bike Accident) तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, ‘हेल्मेटनं रोखला मृत्यू’. तसेच आणखी एकाने लिहिले आहे, ‘हेल्मेट गेल *** ..त्या म्हाताऱ्या काकाना किती लागल ते पहा, अश्या बाईक राईडमुळे सामान्य जनतेला त्रास होतो’.