पाचगणीत १०३ वर्ष जून्या बिलिमोरिया हायस्कूलच्या इमारतीला आग

0
60
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाबळेश्वर प्रतिनीधी | जगप्रसिद्ध दोन नंबरचे पठार शैक्षणिक केद्र पाचगणी येथील 103 वर्षाची पार्श्वभूमी असणाऱ्या बिलिमोरि या इंग्रजी माध्यम हायस्कूलला आज सकाळी दहा वाजता अचानक आग लागल्याने शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र शाळेचा पहिला मजला हा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह म्हणून वापर केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकडाउन काळामध्ये कोरोनाव्हायरस असल्याने सर्वच शाळा बंद होत्या. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र लागलेली आग ही मोठ्या प्रमाणात असल्याने आत असणारे मुलांचे शालेय साहित्य यासह इतर सर्व फर्निचर कपडे यासह मोठ्या प्रमाणात साहित्य जळाल्याने लाखो रूपयाचे नुकसान झाले असल्याचे माहितीसमोर येत आहे.

दरम्यान, घटनास्थळावर पाचगणी नगरपालिकेचे अग्निशामक बंब दाखल झाले असून आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू झाले आहेत. आग कशामुळे लागली याबाबत पोलिसप्रशासन चौकशी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here