हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मायक्रोसॉफ्ट कंपनीचेसह संस्थापक बिल गेट्स यांना रविवारी एका मुलाखतीमध्ये करोना विषाणूच्या साथीमुळे ही पुढील चार ते सहा महिन्यामध्ये परिस्थिती अधिक चिंताजनक होईल अशी भीती व्यक्त केलीय. गेट्स यांची संस्था करोनाची लस विकसित करण्यासाठी आणि ती जगभरामध्ये उपलब्ध करुन देण्याची वितरण साखळी उभारण्यासाठी सध्या काम करत आहे. अमेरिकेमधील करोना संकटाची दिवसोंदिवस बिघडणारी परिस्थिती पाहून गेट्स यांनी हा इशारा दिला आहे.
बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष असणाऱ्या बिल गेट्स यांनी सीएनएनला एक विशेष मुलाखत दिली. यामध्ये बिल गेट्स यांनी, “या साथीच्या काळावधीचे पुढील चार ते सहा महिने परिस्थिती अंत्यत वाईट होऊ शकते. आयएचएमआय (इंस्टिट्यूट फॉर हेल्थ मैट्रिक्स अँड एवेल्यूएशन) च्या अंदाजानुसार या कालावधीमध्ये करोनामुळे दोन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू होऊ शकतो. आपण मास्क घातलं नाही, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले तर मृत्यूचा हा आकडा नियंत्रणामध्ये आणू शकतो,” असं मत व्यक् केलं.
मागील काही आठवड्यांमध्ये अमेरिकेत करोनाचा संसर्ग झाल्याचे, मृत्यूचे आणि रुग्णालयामधील अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. “ही परिस्थिती अमेरिका चांगल्या पद्धतीने हाताळेल असं मला वाटतं,” असं मतही बिल गेट्स यांनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे गेट्स यांनी करोनासारखी मोठी साथ येईल अशी भविष्यवाणी २०१५ मध्येच केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’