अमरावती । राज्यातील तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असा वारंवार दावा विरोधी पक्ष भाजपमधून करण्यात येतोय. दरम्यान,महाविकास आघाडी भक्कम असल्याचे वारंवार सत्तेतील नेते सांगत असताना भाजपातील ४० आमदार आमच्या संपर्कात असल्याचे खळबळजनक विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलंय. फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार असल्याचेही ते म्हणाले. ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
बच्चू कडूंच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीय. बच्चू कडुंचे हे विधान खरं ठरणार असेल तर हे आमदार कोण असतील ? यावरील चर्चेला सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस सक्षम विरोधीपक्ष नेता असल्याचे कबुल करतील तेव्हा भाजपातील ४० आमदार फुटतील असा दावाही बच्चू कडू यांनी केला आहे.
याशिवाय महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून विरोधी पक्षच अस्थिर असल्याचा टोला राज्यमंत्री बच्चू कडू भाजपाला लगावला आहे. पुढील ५ वर्षे महाविकास आघाडीचं सरकार स्थिर राहीलं असेही ते म्हणाले. दरम्यान बच्चू कडूंच्या दावा किती भक्कम आहे हे येणार काळाचं सांगेल. मात्र, सध्या तरी बच्चू कडूं यांनी भाजप आमदार फुटणार असल्याचा जोरदार बॉम्ब टाकत भाजपाला हादरा दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”