ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक; सरकारविरोधात आंदोलन

औरंगाबाद – ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने औरंगाबादेत क्रांती चौकात ओबीसी आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी ‘उठ ओबीसी जागा हो, एकजूटीचा धागा हो !’, वडेट्टीवार राजीनामा द्या’, अशा घोषणा देण्यात आल्या.

या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणांमुळे व दिशेमुळे ओसीबी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने जे कागदपत्रे मागितली होती, ती तत्परतेने द्यायला पाहिजे होती. ती दिले गेली नाही. हे आघाडी सरकारचे अपयश आहे. सरकारच्या दिरंगाई व हलगर्जीपणामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचा आरोप केनेकर यांनी केला.

विजय वडेट्टीवारांनी राजीनामा दिला पाहिजे. फार ओबीसींचा कळवला होता ना आता राजीनामा द्या, अशी मागणी त्यांनी केली यावेळी केली. ओबीसी जनता त्यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका केनेकर यांनी महाविकास आघाडीवर केला.