Thursday, March 23, 2023

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन ; आंदोलक व पोलिसात झटापट

- Advertisement -

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज जालना रोड येथे भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करताना आंदोलक आणि पोलिसांत झटापट पाहायला मिळाली.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे 100 कोटी रुपये मगितल्याचा धक्कादायक आरोप गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग यांनी केला आहे.या नंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्याच पर्शवभूमीवर आज शहरातील जालना रोडवर भाजपच्या वतीने मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा भाजप आंदोलक जाळण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पडला. दरम्यान पोलीस आणि आंदोलकामध्ये झटापट पाहायला मिळाली. पोलिसांनी आंदोलकाकडून तो पुतळा जप्त केला. आंदोलकाकडून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, अनिल मकरीये, आदींची उपस्थिती होती.

लॉकडाऊनमध्ये भाजपचा राडा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात १४४ लागू असतानाही असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात राडा झाला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलीस प्रशासनाकडून प्रचंड पोलीस फाटा तैनात करणयात आला होता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group