हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष सज्ज झाला असून आज भाजपचे आपल्या सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघ आणि 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये पुणेसाठी मुरलीधर मोहोळ, शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पक्षाच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. सर्व नियुक्त प्रमुखांचे अभिनंदन!
सर्व निवडणूक प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट करून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीला विजय मिळवून देतील.… pic.twitter.com/ow7iZXksc1— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 8, 2023
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत हि यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघ आणि २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. सर्व नियुक्त प्रमुखांचे अभिनंदन! सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट करून २०२४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपा – शिवसेना युतीला विजय मिळवून देतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. सर्व नियुक्त प्रमुखांचे अभिनंदन!
सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट करून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीला विजय मिळवून देतील.… pic.twitter.com/xdDXVVSbVy— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 8, 2023
दरम्यान, २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणूक हि महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. एकीकडे शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गट अशी काटे कि टक्कर पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचितचे प्रकाश आंबेडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणानंतर प्रथमच एखादी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणार असून जनता नेमकं कोणाच्या पारड्यात मत टाकणार याकडे सर्वांचं लक्ष्य असेल.