हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मंदिरे सुरू करण्यावरून विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच त्यांनी राज्यव्यापी आंदोलनही केलं होतं. परंतु जनतेच्या काळजीपोटीच मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले होते. त्यातच आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही या विषयावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. प्राचीन दंतकथेतील आटपाट नगरीच्या कथेचा आधार घेत शेलार यांनी ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे.
यासंदर्भात आशिष शेलार ट्विट करून म्हणतात, ”आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट… महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात कोरोनासोबत पावसाने थैमान घातलेले… शेती, घरे, गुरे सारे काही उद्ध्वस्त झालेले… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर अनावर… तेव्हा नगराचे राजे ‘बॉलिवूड’ कसे वाचवायचे यावर चिंतातूर झालेले… मदतीसाठी राजा येतच नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता आता मंदिरे तरी उघडा असा अर्जव करतेय… त्यावेळी नगरात कुणीही मागणी केलेली नसताना पब, बार, रेस्टॉरंट रात्री 11.30 पर्यंत खुले ठेवून ‘नाईट लाइफ’ची काळजी राजपुत्र करत आहेत…दुर्देवी चित्रं… ‘महाराष्ट्र नगरी आणि चौपट राजा’..,”
आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट..
महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात कोरोना सोबत पावसाने थैमान घातलेले…शेती, घरे, गुरे, सारे काही उध्वस्त..शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर अनावर..
तेव्हा नगराचे राजे "बॉलिवूड" कसे वाचवायचे यावर चिंतातुर झालेले!
(1/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 16, 2020
मदतीसाठी राजा येत नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता, आता मंदिरे तरी उघडा असा आर्जव करतेय..
त्यावेळी नगरात कुणीही मागणी केली नसताना..
पब,बार, रेस्टॉरंट रात्री 11.30 पर्यंत खुले ठेवून"नाईटलाईफची"काळजी "राजपुत्र" करीत आहेत..दुर्दैवी चित्र..
"महाराष्ट्र" नगरी आणि चौपट राजा!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 16, 2020
गेल्या काही दिवसांपासून मंदिराच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष भाजप चांगलाच आक्रमक झाला असून ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. तसेच राज्यपाल भगत सिंग कोशारी यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरे उघडण्याची मागणी केली होती. तसेच शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. परंतु आमच हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना फटकारले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’