व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बदल्यांची यादी देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पोलिसांच्या बदल्यांच्या याद्या मला अनिल परब द्यायचे असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल परब यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर यांनी यावरून ट्विट करत सवाल केला आहे “बदल्यांची यादी देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं?,” असा सवाल त्यांनी ट्वीट करत केला आहे. दरम्यान, देशमुखांच्या गौप्यस्फोटाने अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख नेमक काय म्हणाले होते-

राज्यातील पोलीस बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब आपल्याकडे देत असल्याचा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी ईडीकडे केला आहे. कदाचित परब यांना शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी मिळायची आणि ते माझ्याकडे द्यायचे, पुढे तीच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती असे अनिल देशमुख यांनी जबाबात नमूद केले आहे. अनिल देशमुखांच्या गौप्यस्फोटाने अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.